दापोली: दापोलीत 10 ऑक्टोबरला आदिवासींचा आक्रोश मोर्चा व ठिय्या आंदोलन होणार आहे.बोगस आदिवासींना नोकरीवरून काढा,सेवासंरक्षण देऊ नका,खोट्या जात प्रमाणपत्र धारकांवर गुन्हा दाखल करा व मूळ आदिवासी उमेदवारांना नोकरीवर घ्या.या मागणीसाठी बिरसा फायटर्स तर्फे दापोलीत 10 ऑक्टोबर 2022 रोजी मोर्चा व ठिय्या आंदोलन होणार आहे. या मोर्चा व आंदोलनाला आदिम आदिवासी कातकरी संघटनेने पाठिंबा देत मोर्चा व आंदोलनात प्रत्यक्षात सामील होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलास निकम व जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.

                     आपण रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी उमेदवार पदवीधर व उच्च शिक्षित आहेत. तरी चुकीच्या भरती प्रक्रियेमुळे हे उमेदवार बेरोजगार आहेत. भरती प्रक्रियेची साधी जाहीरात सुद्धा या उमेदवारांपर्यंत पोहचत नाही.त्यामुळेच विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरीला लागणे म्हणजे त्यांच्यासाठी खूप लांबचीच गोष्ट आहे.म्हणून विद्यापीठात स्थानिक आदिवासी उमेदवारांना नोकरी भरतीत प्राधान्य द्या,जेणेकरून येथील आदिवासी समाज विकासाच्या प्रवाहात येईल, आदिवासी समाजाचे अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. म्हणून शासनाने आदिवासी उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम प्रक्रिया राबवावी तसेच इतर मागण्यांकरिता आपण बिरसा फायटर्स संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी दापोलीमध्ये मोर्चा व प्रशासकीय कार्यालय कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे ठिय्या आंदोलन करणार आहात, असे आपल्या पत्रात नमूद केले आहे.

असे पत्र विवेक अहिरे पोलीस निरीक्षक दापोली पोलीस ठाणे यांनी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांना दिले आहे.

                बिरसा फायटर्स व आदिम आदिवासी कातकरी संघटनेतर्फे दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता दापोलीत आझाद मैदान पासून पोलीस ठाणे,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती दापोली,तहसिल कार्यालय मार्गे कोकण कृषी विद्यापीठ दापोली पर्यंत मोर्चा होणार आहे व दुपारी 1 वाजता कृषी विद्यापीठ दापोली समोर ठिय्या आंदोलन होणार आहे, या आंदोलनात आदिम आदिवासी कातकरी संघटनासुद्धा शामिल होणार आहे, अशी माहिती सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे