सिंदफणा मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झल्याने सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांच्याकडुन जलपूजन करण्यात आले.

अनेक गावांसाठी वरदान असणारा सिंदफणा मध्यम प्रकल्प बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज पहाटे 3 च्या सुमारास पूर्ण भरला असून ओसंडुन वाहत आहे. सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी पिंपळनेर व गोमळवाडासह परिसरातील शेतकरी व नागरीकांसह धरणावर जाऊन जलपूजन केले. यावेळी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडेसाहेब शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन व संचालक मा. दिलीप आण्णा जायभाये, जेष्ट पत्रकार मा. गोकुळ पवार यांचेसह आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.