संगमेश्वर : काढल्यामुळे पूर्णतः भरलेल्या शास्त्री नदीच्या पुरामुळे परिसरातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्य शासनामार्फत या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांमार्फत आमदार शेखर निकम यांना देण्यात आले.

सह्याद्री प्रचितगडाच्या कुशीतून उगम पावलेली शास्त्री नदी सह्याद्री अखेरची घटका मोजत आहे. कातुड, निवळी, शृंगारपुर, कपाचीवाडी, नायरी, तिवरे, कोड, कारभाटले, उमरेकोंड, अणदेरी, हेदली, कळंबस्ते, फणसवणे या गावांची शास्त्रीनदी जीवनवाहिनी आहे. विस्तारलेल्या पात्राची लांबी गाळ नदीचे पात्र पूर्वी फार मोठे होते. साचल्यामुळे हळुहळू कमी होऊ लागली आहे. मुसळधार पाऊस पडताच शास्त्री नदीतील पाणी भातशेतीत घुसून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र पोमेंडकर, सह्याद्री प्रचितगड विकासचे संदेश कुवळेकर, जयेश सावंत आदींनी आमदार शेखर निकम त्यांची सदिच्छा भेट घेऊन शास्त्री नदीच्या पाण्यामुळे होणारे शेतकन्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. आ शेखर निकम यांनी जिल्हाधिकान्यांसह संबंधित विभागाच्या अधिकान्यांशी मोबाईलद्वारे शिष्टमंडळासमोर चर्चा केली. शास्त्री नदीतील गाळ उपसण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आ. शेखर निकम यांनी शिष्टमंडळाला दिली.