वृक्षलागवडीबद्दल अभिनंदन, धरणाच्या चादरीवरील भिंतीस धोकादायक पिंपळाची झुडपे काढावीत-डाॅ.गणेश ढवळे

वृक्षलागवडीबद्दल अभिनंदन पण धरणाच्या " मोठ्या चादरीवरील "भिंतीस धोकादायक पिंपळाची झुडपे काढावीत ;जिल्हाधिका-यामार्फत सुनिल केंद्रेकर विभागीय आयुक्त यांना निवेदन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

आज दिनांक.११ सप्टेंबर रविवार रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त सन २०२२ च्या पावसाळ्यात बीड येथे मानवी साखळी द्वारे बिंदुसरा नदीवरील धरणापासून ते बीड शहरापर्यंत नदीचे अंतर ८ किलोमीटर असुन नदीच्या किनाऱ्यावर दोन्ही बाजुने १६ किलोमीटर पर्यंत बांबु आदि रोपांची वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली यावेळी जिल्हाप्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा,पोलीस अधीक्षक नंदकुमारजी ठाकूर,मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार तसेच तहसिलदार सुहास हजारे,वनविभाग तसेच विविध सामाजिक संघटना याच्या द्वारे कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला. 

बिंदुसरा धरणाच्या " मोठ्या चादरीवरील भिंतीस धोकादायक पिंपळाची झुडपे काढा; जिल्हाधिकारी बीड ,कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त यांना निवेदन 

बिंदुसरा धरणाच्या मोठ्या चादरीवर ३-४ ठिकाणी पिंपळाची झुडपे उगवली असून त्यामुळे भविष्यात भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तात्काळ झुडपे काढुन टाकण्यात येऊन याबाबीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संबधित जबाबदार आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी बीड तसेच कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक ३ बीड यांच्यामार्फत विभागीय आयुक्त औरंगाबाद सुनिल केंद्रेकर यांना करण्यात आली आहे. 

डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

मो.नं.८१८०९२७५७२