औंढा नागनाथ तालुक्यातील लंपी प्रदुभाव रोगाचे लसीकरण 95 टक्के पूर्ण

औंढा नागनाथ तालुक्यातील लंपी प्रदुभाव रोगाचे लसीकरण 95 टक्के पूर्ण झाले असून या लसीकरणात तालुक्यातील सर्व गावात ही मोहीम राबवण्यात आली तालुक्यातील एकूण गाय वर्गातील चार महिन्याच्या वरील 40516 जनावरांना लसीकरण तालुक्यात करण्यात आले. औंढा तालुक्यातील पैशु वैद्यकीय दवाखान्याच्या मार्फत पूर्ण लसीकरण करण्यात आले असून सदर लसीकरण हे मोफत करण्यात आले आहे उर्वरित पशुपालकांनी आपल्या गाय वर्गीय जनावराचे लसीकरण आपल्या नजीकच्या पैशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत करून घेण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ एस एन नरवाडे पंचायत समिती औंढा नागनाथ यांनी केले आहे,,