रत्नागिरी- मुंबई विद्यापीठ आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय आयोजित आंतरमहाविद्यालयीन कोकण विभाग वेटलिफ्टिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. रत्नागिरी -रायगड -सिंधुदुर्ग झोन ४ मध्ये ७६ किलो वजनी गटात भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाची तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची दिशा दिपक झोरे हिने प्रथम क्रमांक प्राप्त करुन मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

दिशा झोरे हिचे संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, क्रीडा विभागप्रमुख प्रा. वैभव घाणेकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.वैभव कीर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.