लम्पी स्किन या पशुधनाच्या। विषाएक लाख बत्ती संसर्गिय‌ आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख ३२हजार ५८१ गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले असून नऊ जनावरे दगावली असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दिली आहे.

लम्पी स्कीन हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. मात्र हा आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. हा आजार गोवांशिय पशुधनात जास्त प्रमाणात आढळतो.‌ या आजाराच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. जिल्ह्यात जनावरांच्या वाहतुकीस, बाजार व शर्यतीस बंदि आहे. एखादे लम्पी संशयित जनावर‌ आढळल्यास ते जनावर इतर जनावरांच्या संपर्कात येणार‌ नाही याची काळजी घेतली जात आहे. गोठ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे तत्काल लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख ७६ हजार‌ ७७५ गोवंश वर्गातील पशुधन असून, आत्तापर्यंत एक लाख ३२ हजार ५८१ गोवंश पशुधनाचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ६८ जनावरांची बाधित आढळली आहेत. यामध्ये वीस गायी तर तर अठेचाळीस त्यापैकी ४६जनावरे ही कर्जत तालुक्यातील असून उर्वरित रोहा दोन,अलिबाग एक,उरण दोन,माणगाव दोन,पनवेल दोन तर खालापूर,पेण, श्रीवर्धन, महाड येथे प्रत्येक एक जनावर बाधित आढळून आहे.यापैकी कर्जत येथे सात तर पनवेल, खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एक असे दोन जनावरे दगावली आहेत. आजपर्यंत मुरूड,म्हसळा, पाली,तळा,पोलादपूर या तालुक्यात लम्पि या आजाराने शिरकाव केलेला नाही आहे,द्यस्थितीत नऊ जनावरे ही बाधित असून यापैकी कर्जत येथील तीन तर पनवेल तालुक्यातील एक असे चार जनावरे गंभीर आहेत.मयत असलेल्या नऊ जनावरांपैकी चार जनावर मालकांना शासनाने रु ८७हजार नुकसान भरपाई दिली असून पाच प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात शासनाने एक लाख पंचावन्न हजार लस दिली असून त्यापैकी एक लाख ३२ हजार ५८१ लसीकरण करण्यात आले आहे.सर्वाधिक लसीकरण हे कर्जत तालुक्यात १९हजार८२३ तर उरण तालुक्यात सर्वात कमी म्हणजे दोन हजार एकशे पन्नास इतके लसीकरण करण्यात आले आहे.या लसीकरणात पाच किलोमीटर परिघात सोळा हजार तीनशे तीस जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडे २१हजार १५७लस साठा शिल्लक आहे.

■ रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील जनावरांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली असून जिल्हा प्रशासन अधिकारी यानी कर्जत उपविभागीय अधिकारी तसेच कर्जत तहसीलदार यांना सूचना देऊन त्वरित त्या मार्गावरील जनावरांची वाहतूक बंद करण्यास सांगितले आहे.कर्जत तालुका हा लम्पि आजराबाबत जिल्ह्यातील हॉटस्पॉट(उद्रेक)ठिकाण बनले आहे.

■ रायगड जिल्ह्यात लम्पि या आजाराचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीला मुंबई परेल येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, निवृत्त अधिकारी कर्मचारी,तर वीस कामगार हे कंत्राटी पध्दतीने घेतले आहे.

................

पशुधनात लम्पी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित पशुवैद्यकीय चिकिस्तालय किंवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यात गोवंश वर्गिय पशुधनाचे १०० टक्के लसिकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोवंश वर्गिय पशु पालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून, लसीकरण करून घ्यावे, तसेच गावात लसीकरण मोहिम सुरू असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

: डॉ. शामराव कदम

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद रायगड

................... 

लवकरच जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण पूर्ण होईल, यादृष्टीने नियोजन करावे. आजारी जनावरांना तात्काळ उपचार उपलब्ध करुन द्यावे,असेही निर्देश देण्यात आले आहे.:-डॉ. किरण पाटील.मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.🎂

..............

 जनावरांच्या मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशांचे पालन व्हावे. ही विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीनेच लावण्यात यावी. जिल्ह्यात जी जनावरे दगावली त्या पशुपालकांना द्यावयाच्या मदतीबाबत तात्काळ उपाययोजना कराव्या. दुधाच्या सेवनाबाबत जनतेच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी. जनावरांचे मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यासाठी प्रयत्न करावे. शहरी भागातील जनावरांच्या लसीकरणालाही गती द्यावी.:डॉ. महेंद्र कल्याणकर. जिल्हाधिकारी, रायगड.