जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगल घातलेले पाण्याने भिजून गेले आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी अवस्थेत असताना शेतात पाणीच पाणी झालेले आहे. बीड तालुक्यातील ८ पेक्षा अधिक महसूल मंडळात व शिरूर तालुक्यातील २ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्रीच्या सुमारास झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई द्यायला हवी तर शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान ऍपवर नुकसानीची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.