पाथरी(प्रतिनिधी):पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने ६६ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन सोहळा शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेळकर पुतळा परिसर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी बौध्द अनुयायी यांची मोठ्या संख्यने उपस्थीती होती.

       भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आशोक विजयादशमी च्या निमित्ताने १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयाया सहीत नागपुर येथे बौध्द धम्माची दिक्षा घेतली.याच दिनाचे अनुसरन म्हणुन देश व विदेशा मध्ये प्रतीवर्षी आशोका विजयादशमीच्या निमित्ताने धम्मचक्र प्रर्वतन दिनी आंबेडकर अनूयायी अनंद ऊत्सव म्हणुन कार्यक्रमाचे आयोजन करत असतात.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने माजी ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या मार्गदर्शनामध्ये व वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष शामराव ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली ६६ व्या धम्मचक्र प्रर्वतन दिन सोहळ्याचे दि.५/१०/२०२२ रोजी सकाळी ११:० वा.आयोजन करण्यात आले होते.

     या वेळी पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहीरे यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार आर्पन करण्यात आला याच बरोबर भारतीय सैन्य दलातील जवान सतिष ऊजगरे यांच्या हस्ते धम्मध्वजाचे रोहन करण्यात आले तर बुध्द वंदनेचे व बाविस प्रतीज्ञाने पठन टि.एम शेळके सर व बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी केले.

    या वेळी जेष्ठ नेते प्रकाश ऊजागरे,वंचितचे जिल्हा अध्यक्ष टि.डी.रूमाले,भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष टि.एम.शेळके,युवा नेते दिलीप मोरे,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे,पत्रकार आवडाजी ढवळे,माजी नगर सेवक विठ्ठल साळवे,लक्ष्मन कांबळे,अनिल ढवळे,सतीष वाकडे,डाॅ.अधिकार घुगे,अनिल उजगरे सर,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार भास्कर पंडीत,पत्रकार राजकुमार गायकवाड,पत्रकार लक्ष्मन उजगरे,नाथभजन सर,लिंबाजी ढवळे,आरविंद कांबळे,विष्णु वैराळ,गोकर्णाबाई कदम,विशाखा पतसंस्थेच्या अध्यक्षा शिंदे मॅडम,पोलिस जमादार संगिता वाघमारे,सखुबाई उजगरे,शाहिर महादेव वाव्हळे,शाहिर गणेश उजगरे आदी उपस्थीत होते तर कार्यक्रमाचे प्रस्तावीक भारतीय बौध्द महासभेचे माजी ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांनी केले तर सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी मानले सदर कार्यक्रमास पाथरी शहरा सहित तालुक्यातील हजारो आंबेडकर अनुयायी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करुन उपस्थीत होते.