पुणे जिल्ह्यामध्ये पीएमआरडीएच्या माध्यमातून विशेषता शिरूर हवेली तालुक्यातील अनेक गोर गरीब जनतेला पुणे महानगर विकास प्राधिकरणकडून नोटीस पाठवून त्यांची घरे पडण्याच्या कारवाया करण्यात येत असून सदर कारवाया थांबविण्यासाठी भारतीय पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कारवायाा थांबवण्याची मागणी केली आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांसह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, विशाल इंगळे, पंकज काळे आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी सदर पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले ,यामध्ये शिरूर हवेलीतील अनेक नागरिकांच्या घराबाबत पुणे महानगर विकास प्राधिकरणकडून नोटीस देऊन सदर घराचे बांधकाम अनधिकृत असल्याबाबत सांगून घरे पाडण्यात येत आहेत, अनेक गोरगरीबांनी प्लॉटिंग मध्ये जागा घेऊन कर्ज काढून घरे बांधलेली असल्यामुळे नागरिक देखील भयभीत झाले असून आपण याबाबत मार्ग काढून सदर विभागाला सुचना देत नागरिकांवरील कारवाया थांबवाव्या अशी मागणी लेखी निवेदना द्वारे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.