बीड, दि. 6 : सहाय्यक संचालक, नगर रचना बीड या कार्यालयातील वर्ग - 4 शिपाई या पदाच्या उमेदवाराची सेवा बाह्ययंत्रणेव्दारे मान्यताप्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मान्यताप्राप्त संस्था/कंपनी यांनी दरपत्रक सीलबंद पाकिटात दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, नगर रचना फु. वि. नांदे यांनी केले आहे.

मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून या कार्यालयास एक वर्ग -4 शिपाई पदासाठी (किमान चौथी पास असणे आवश्यक आहे) उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देणेकामी दरपत्रक मागविण्यात आले आहेत. दरपत्रके सीलबंद पाकिटात दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी 5 वाजेपर्यंत सहाय्यक संचालक, नगर रचना, जूनी नगर परिषद इमारत, बशीरगंज रोड, बीड या कार्यालयाकडे पोहोचतील अशा बेताने पाठविण्यात यावे. तसेच अटी व शर्ती सहाय्यक संचालक, नगर रचना, या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. असे यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.