संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने व डॉ. कमलताई काशीराव देशमुख, नागपूर यांचेकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून प्रथम कुलगुरू डॉ.के.जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे सोमवार, दि. 10 ऑक्टोबर, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथे आयोजन करण्यात आले आहे.

                 व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे भूषविणार असून ‘समग्र उच्चशिक्षणाची दिशा’ या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर सन्माननीय वक्ते म्हणून अभ्यासपूर्ण व्याख्यान देतील. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, दि बी.जी.ई. सोसायटी, अकोलाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता व दानदाते डॉ. कमलताई काशीराव देशमुख, नागपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.

                तरी आयोजित व्याख्यानमालेचा सर्व नागरिकांनी व विद्याथ्र्यांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख व श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोलाचे प्राचार्य डॉ.एस.जी. चापके यांनी केले आहे.