शिरुरच्या सभापतीला जीवे मारण्याची धमकी देत मागितली खंडणी

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर तालुक्यात वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून खंडणी मागण्याचे तसेच खंडणी उकळण्याचे प्रकार वारंवार घडत असताना आता चक्क शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांना जीवे मारण्याची धमकी देत चक्क पन्नास लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने वाल्मिक चिमाजी फंड याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                          रांजणगाव गणपती ता. शिरुर येथे वाल्मिक फंड याने आशिष ओस्तवाल याच्या कारवर दगड मारून काच फोडली होती, त्यामुळे आशिषचे नातेवाईक सुनील ओस्तवाल व माजी सभापती विश्वास कोहकडे हे वाल्मिक फंड याला जाब विचारण्याच्या त्याच्या घरी गेले होते, त्यांनतर वाल्मिक याने माजी सभापती विश्वास कोहकडे यांना फोन करुन तू सुनीलची बाजू घेऊन माझ्या घरी का आला होता, तुला त्याच्या बरोबर राहायचे असेल तर तर मला पन्नास लाख रुपये द्यायचे नाहीतर मी सुनीलच्या सोबत जो राहील त्याचा पण आणि सुनीलचा मर्डर करेल असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत चक्क पन्नास लाखांची खंडणी मागितली, त्यांनतर वाल्मिक फंड याने सुनील ओस्तवाल यांना देखील आमच्या गावात तुला प्लॉटिंग करायचे असेल तर मला पन्नास लाख रुपये द्यावे लागतील असे म्हणून माजी सभापती विश्वास कोहकडे व सुनील ओस्तवाल या दोघांना देखील पन्नास लाखांची खंडणी मागितली, याबाबत शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कृष्णाजी कोहकडे वय ५६ वर्षे रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी वाल्मिक चिमाजी फंड रा. बाभूळसर खुर्द ता. शिरुर जि. पुणे याचे विरुद्ध खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे हे करत आहे.