गेवराई (प्रतिनिधी) पोखरा योजेनेतील भ्रष्टाचार प्रकरणी आलेल्या तक्रारी बाबत मी यापूर्वीच कृषी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. परंतु अधिवेशन सुरू झाल्यामुळे व पुढील काही नियोजित कामामुळे हे शक्य झाले नाही. परंतु याबाबत दोन दिवसांपूर्वी मी संबधित कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला असून आता उद्या दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वा. बैठकीचे आयोजन केले असून पोखरा योजनेबाबत ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणी असतील त्यांनी स्वतः या बैठकीला उपस्थित राहून तक्रारी कराव्यात असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे.
गेवराई तालुक्यातील 62 गावात पोखरा योजना चालू आहे. या योजनेंतर्गत विविध प्रकल्पाचा लाभ घेण्याऱ्या शेतकऱ्यांची अधिकारी व कर्मचारी विनाकारण अडवूनक करत असल्याचा तक्रारी येत असून याबाबत ही बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी असतील त्यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता जे अधिकारी व कर्मचारी विनाकारण अडवनूक करून पैशाची मागणी करतात त्यांच्या नावासह माझ्याकडे तक्रार करा, कुठल्या अधिकाऱ्यांना घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही तक्रारी केल्या तर मला याबाबत तात्काळ तुमचे अडवलेले कामे मार्गी लावता येतील. यासाठी उद्या दि. 7 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 11:00 वा. कृषी कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी जास्तीत जास्ती शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित रहावे असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे.