वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे विवाहित 20 वर्षीय महिला अंघोळ करून कपडे बदलत असतानाचे चोरुन नग्र फोटो काढत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. व जर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आत्या भावानेच 20 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. वारंवार ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करणार्या तरुणाला महिला कंटाळली होती. विवाहित महिलेने संबंध ठेवण्यास नकार देताच तरुणाने अश्लील फोटो व्हायरल करत विवाहित महिलेची बदनामी केली आहे. म्हणून विवाहित महिलेने वडवणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी तालुक्यातील चिंचाळा गाव मामाचे असल्याने मामाच्या घरी राहून प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी तरुण आकाश नानाभाऊ काळे (रा. गंगनाथवाडी ता. जि. बीड) हा चिंचाळा येथे राहत होता. राहत असताना घरामध्ये असणार्या सख्या मामाच्या सुनेवर तरुणाची वाईट नजर पडली. वाईट हेतूने वीस वर्षीय विवाहित महिला आंघोळ करून कपडे बदलत असताना या तरुणाने दि. 15. 05. 2021 रोजीचे सकाळी दहा वा. पासून ते दि. 21 /08/2021 च्या दरम्यान चोरून आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करत फोटो काढले. व विवाहित महिलेला फोटो दाखवून संबंध ठेवण्याची मागणी केली. फोटो पाहून महिला घाबरून व गोंधळून गेली असल्याने संबंधीत महिलेवर आत्यभावाने बळजबरीने 3 महिने अत्याचार केला. व वारंवार ब्लॅकमेल करत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. विवाहित महिला या गोष्टीला विरोध करत होती. परंतु तरुण ऐकत नव्हता नकार दिल्याचा राग मनात धरून विवाहित महिलेचे अश्लील फोटो दि. 3 ऑक्टोबर रोजी रात्री 2 वाजता महिलेच्या पतीसह नातेवाईक यांच्याकडे फोटो व्हायरल करत विवाहित महिलेची बदनामी केली आहे. म्हणून विवाहित महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठत विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून आकाश नानाभाऊ काळे रा.गंगनाथवाडी ता.जि. बीड याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात गु.र.नं-211/2022 कलम- कलम -376, 354 (क) भा.द.वि सह कलम 66 (ई) 67 (अ) माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक फराटे करत आहेत. अश्लील फोटो दाखवत बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याची घटना दसरा सणाच्या पूर्व संध्येला उघडकीस आल्याने वडवणी तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. नवरात्रात महिलांना विशेष दुर्गामातेचं रूप मानलं जातं परंतु या नवरात्रात एका महिलेवर अत्याचार झाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपीला पोलीसांनी घेतले ताब्यात अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या तात्काळ मुसक्या आवळलत ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. वडवणी न्यायालयात आरोपीला उभा केले असता अधिक तपासासाठी न्यायालयाने 3 दिवसांची आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.अशी माहिती एपीआय आनंद कांगुणे यांनी दिली आहे.