औरंगाबाद : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारी ब्राह्मणगाव येथील जय भगवान ट्रेडर्स यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली आहे . या वेळी येथील शेतकरी मधुकर ढाकणेंसह अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला कापूस असता त्यांना विक्रमी १६०५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला . मागच्या वर्षीदेखील कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे . परिसरातील कपाशी पिके बहरलेली असून वेचणीला सुरुवात झाली आहे . परंतु , गेल्या महिनाभरापासून परिसरात पाऊसच पडला नसल्याने कपाशीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे . मात्र , सध्या भाव चांगला मिळत असल्याने व हाच भाव शेवटपर्यंत कायम राहिल्यास काहीसा दिलासा मिळेल , असे अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली