संगमेश्वर : तालुक्यातील लोवले (दोरकडेवाडी) येथील श्री सिताराम झिलू दोरखडे यांच्या निवासस्थानी स्थानापन्न झालेल्या दुर्गा देवीच्या मूर्तीचे आज विसर्जन करण्यात आलें. यावेळी दोरकडेवाडीचे ग्रामस्थ एकत्र येऊन भगिनी मुले व अबाल वृद्ध यांच्या समवेत वाजत गाजत व नाचत जल्लोषात विसर्जन पार पडले.

            

गेल्या नऊ दिवसात नवरात्र उत्सवात भजन, टिपऱ्या, गरबा, महाप्रसाद ,आरती असे विविध कार्यक्रम २२ व्या वर्षात विना तक्रार संपन्न झाले. अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून देवीचा आशीर्वाद प्राप्त केला.