दोदडगाव नजदिक कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी..

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

पाचोड/ कुंटुबातील सदस्यांना गोंदी येथे नांगपंचमी सणासाठी सोडून औरंगाबादकडे परतात असणाऱ्या औरंगाबाद येथील एका पोलीस कर्मचारी यांच्या ब्रेझा कारचा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील दोदडगाव फाटा ता.अंबड नजदीक अपघात झाल्याची घटना (दि.२) रोजी सकाळी दहावाजेच्या सुमारास घडला आहे.

याविषयी अधिक माहीती अशी की, औरंगाबाद येथील एक पोलिस कर्मचारी सकाळी आपल्या कुंटूबाला अंबड तालुक्यातील गोंदी नागंपचमी सणासाठी सोडून पुन्हा औरंगाबाद ला आपल्या ब्रेझाकार क्रमांक(एम.एच.१४.जीएच.३०७९)मधू परतत असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गवरील दोदडगाव फाटा ता.अंबड नजदीक त्यांचे कारवरील अचानक नियंत्रण सुटल्याने कारने महामार्गावर तीन-चार पलट्या मारल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.