हिंगोली गुन्हे शाखेने 6 ठिकाणी घरफोडी गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडील 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत घरफोडीचे गुन्हे सातत्याने घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत होता.तर या प्रकरणातील बागल पार्टी या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेले माहितीच्या आधारे आरोपी सोनाजी शिंदे राहणार टोकाई बागल परडी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सोनाजी शिंदे यांनी हिमायतनगर व परिसरातील साथीदारांच्या मदतीने सदरील गुन्हे केल्याचे कबूल केले आहेत.
प्रकरणांमध्ये एकूण 7 आरोपी असून त्यांनी वसमत ग्रामीण व आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केल्याचे कबूल केले असून या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत असल्याची माहिती आज रोजी प्राप्त झाली आहे.