पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील शेकटा ते बिडकीन रोडवर डोळया मिरची पावडर टाकुन पैसे लुटणारे पाच आरोपी अटक केली तसेच गुन्हयात वापरलेले दोन मोटार सायकल व चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त ...

बिडकिन प्रतिनिधी:-

दिनांक ०१ / १० / २०२२ रोजी दुपारी ०४/०० वा. दरम्यान पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील शेकटा व बिडकीन रोडवर विहामांडवा येथील टेम्पोचालक गोपाल निकम व त्याचा सहकारी दत्ता कोरडे हे जितू पहाडे यांचे विराज अॅग्रोटेक मिल मधुन १०० कट्टे शेंगदाणे घेवून सटाणा जि.नाशिक येथील लक्ष्मी ऑईल मील येथे पोहोच करून त्याचे ५,५८,०००/- रुपये लक्ष्मी ऑईल मिल यांचेकडून घेवून टाटा टेम्पो क्र. एमएच १६ सी सी १०९४ ने परत येत असतांना शेकटा ते बिडकीन जाणारे रोडवर गिधाडा शिवारात हॉटेल माउली समोर असताना आमच्या पाठीमागुन एका मोटार सायकलवरुन अनोळखी तीचे जण येवून गाडी अडवून डोळयात मिरची पावडर टाकुन ड्रायव्हर सिटचे पाठीमागे ठेवलेले ५,५८,०००/- रुपये घेवून गेले वरून गुरनं ४६७/२०२२ कलम ३९२.३४ भादंवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासादरम्यान फिर्यादी नामे गोपाल भगवान निकम व फिर्यादी सोबत असलेले दत्ता दत्ता बाबुराव कोरडे यांना विश्वासात घेवून विचारपुस केली तसेच घटनास्थळावरील हजर असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांना विचारपुस करण्यात आली. तसेच गोपाल भगवान निकम यांचे मोबाईलचे सीडीआर तसेच इतर आरोपीचे सीडीआर वरून १) गोपाल भगवान निकम वय १९ वर्षे रा. विहामांडवा ता. पैठण जि. औरंगाबाद, २) दत्ता बाबुराव कोरडे वय २१ वर्षे, ३) ज्ञानेश्वर गणेश कोलते २२ वर्षे रा. रोशनगांव ता. बदनापुर जि. जालना, ४) देवसिंग निहालसिंल दुल्लत वय २१ वर्षे रा. परदेशवाडी कंडारी खु ता. बदनापुर जि. जालना, ५) बाळु ज्ञानेश्वर अंभोरे वय २० वर्षे रा. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना यांचा सहभाग निष्पण झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली. सदर आरोपींना मा. न्यायालय पैठण येथे हजर केले असता त्यांचा दि.०६/१०/२०२२ रोजी पर्यंत PCR मंजूर करण्यात आला आहे.

तसेच सदर गुन्हयात चोरीस गेलेली रक्कम पैकी ४,५०,०००/- रुपये व गुन्हयात वापरलेले १) बजाज प्लॅटीना कंपनीची मोटार सायकल MH २१ BR ३५४९, २) बजाज प्लसर मोटार सायकल क्र. MH २१ BJ ४४९४ हे जप्त करण्यात आले असून इतर आरोपीचा शोध सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मनिष कलवानिया साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पवन बनसोड साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल नेहूल साहेब व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापुर श्री. प्रकाश बेले साहेब, पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर रेंगे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पोनि श्री यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. संतोष माने, पोउपनि महेश घुगे, पोना / ११५० शरद पवार, पोकों / १२६८ एच. एन धनवे, पोना/७६१ अमोल मगर पोकों/ संदिप धनेधर,पोना नाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा औरंगाबाद ग्रामीण येथील पथक पोउपनि श्री. विजय जाधव, पोहेकॉ संतोष पाटील तसेच सायबर पथक चे अंमलदार योगेश तरमले व जिवन भोलप यांनी केली.

सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल नेहूल साहेब व सपोनि श्री संतोष माने यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश घुगे हे करीता आहेत.