धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आज सकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सर्व बौद्ध बांधवांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या.
"सम्राट अशोकाने ज्या दिवशी धम्मचक्र फिरविले होते त्याच मंगलदिनी त्या धम्मचक्राला डॉ.बाबासाहेबांनी गती दिली. बौद्ध जनतेच्या द्रुष्टीने ही अनन्य साधारण, कधीही न विसरण्यासारखी घटना आहे. म्हणून दरवर्षी अश्विन शुद्ध दशमीला हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. हा सण बाबासाहेबांच्या जीवनातील शेवटची क्रांती आहे. या क्रांतीला जगात तोड नाही. म्हणुन अशोक विजयीदशमी- दसरा हा बौद्धांचा महान आनंदाचा सण आहे. असे आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले