हिंगोली  सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने विविध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस देवुन सन्मान करण्यात आला. यामध्ये महिला, विद्यार्थी-विद्यार्थींनी, बालकांना गौरविण्यात आले. 

शुक्रवार दि.९ सप्टेंबर रोजी सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीच्या वतीने विविध  स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे कोषागार अधिकारी शशीकिरण उबाळे, महावितरणच्या शहर अभियंता सरोजताई चंदनखेडे, प्रा.डॉ.शिवाजी वायभासे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संगित खुर्ची स्पर्धेत विजेत्या प्रथम सुनिताताई भुमरे, द्वितीय प्रा.ज्योतीताई भिसे, तृतीय योगिताताई देशमुख, प्रोत्साहनपर कुंताताई लोखंडे यांना बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर बालगटात सांस्कृतिक स्पर्धा प्रथम आराध्या भिसे, द्वितीय तन्मय कदम व तनिषा कदम, तृतीय नैतिक बियाणी, गायत्री देशमुख, विर अलग, उत्तेजनार्थ शैजल रायलवार, देखावा स्पर्धा प्रथम र्निवेद कांबळे, द्वितीय सुवित भुमरे, तृतीय शिवम पारवे, उत्तेजनार्थ गौरव गरड, सौरभ गरड. संगित खुर्ची प्रथम नैतिक बियाणी, द्वितीय समर्थ बियाणी, तृतीय श्रीशा विसलकर, संगित खुर्ची प्रथम गायत्री गुठ्ठे, द्वितीय गायत्री देशमुख, तृतीय प्रितम धुत या विजेत्यां स्पर्धाकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले.