मंडणगड : गाई व बैलामध्ये पसरलेल्या लंपी रोगाचे

पार्श्वभुमीवर पशुवैद्यकीय विभागाने तालुक्यात लसीकरण मोहीम हातात घेतील आहे. या मोहीमेचे अंर्तगत तालुक्यात लम्पी रोगाचा प्रतिसबंध करणाऱ्या लसीचे सात हजार डोस प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4 ऑक्टोंबर 2022 अखेर 3365 डोसचे तालुक्यात लसीकरण करण्यात आले आहे तालुक्यात एकूण 16522 इतके पशुधन असून त्यापैकी गाई व बैलांची संख्या 12789 इतकी आहे.

तालुक्यात जिल्हा परिषद व राज्य शासनाचे एकूण 9 पशु दवाखाने आहेत यात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची 13 पदे रिक्त असल्याने मोहीम राबविताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर जास्तीचे कामाचा ताण पडला आहे. सुदैवाने तालुक्यातील पशुधनात अद्याप लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. तालुक्यातील दवाखाने व कर्मचारी यांचे गणित लक्षात घेता एकूण 22 पदे कार्यरत असताना कर्मचाऱ्यांची 13 पदे रिक्त असल्याची माहीती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. पुजा शिंदे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.