तरुणीला लग्नाचे आमिषाने बलात्कार करून गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्यावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एप्रिल २०२२ ते जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. आरोपी मिलिंद भोईटे आणि महिला रविना अशी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फिर्यादी आरोपी ओळखीचे असून, तरुणी अनुसूचित जातीच्या आहे. अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केला. हा प्रकार पुण्यातील हडपसर आणि बाणेर परिसरात घडला आहे.