परभणी(प्रतिनिधी) शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी परभणीतून हजारो शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली. याबाबत आ.डॉ पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये सोमवारी बैठक घेण्यात आली.

शिवसेनेच्या मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील दसर्‍याला ऐतिहासिक 56 वर्षांची परंपरा आहे, संपूर्ण राज्य आणि देशभरातून आलेले शिवसैनिक या ठिकाणी विचारांचे सोनं घेऊन परत जातात. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. ‘एक मैदान एक झेंडा एक पक्ष’ अशी या दसरा मेळाव्याची परंपरा आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ते समस्त शिवसैनिकांशी थेट संवाद साधत असत, आता ही परंपरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे चालवत आहेत. यंदाच्या दसरा मेळाव्याला अनोखे महत्त्व प्राप्त झाले असून या मेळाव्यासाठी परभणी जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. यासाठी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ.पाटील यांच्या शिवाजीनगर येथील संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिकांची बैठक आमदार पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, सत्तांतरानंतर यंदाचा होणारा हा दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी महत्त्वाचा असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले

यावेळी उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदू पाटील, संदीप झाडे, सुभाष जोंधळे शहर प्रमुख ज्ञानेश्वर पवार अनिल डहाळे, बाळराजे तळेकर, तळेकर विशू डहाळे अमोल गायकवाड अरविंद काका देशमुख सुशील कांबळे प्रशास ठाकूर नवनीत पाचपोर मारुती तिथे राहुल खटिंग संभानाथ काळे उद्धव मोहिते शुभम हाके बाबू फुल पगार रामा कदम स्वप्नील भारती राहुल गायकवाड अनिल दहिवाळ गौरव तपके, मकरंद कुलकर्णी व असंख्य शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.