संगमेश्वर : तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत . असुर्डे , कोंड असुर्डे आणि आंबेड बुद्रुक अशा तीन ग्रामपंचायती आहेत . या ग्रामपंचायतींमध्ये सध्या सरपंच पदासाठी चढाओढ पहायला मिळत आहेत . सरपंच पदासाठीचा माघारी अर्ज घेण्याच्या तारखेदिवशी या तीन ग्रामपंचायतींमधून २८ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे येथील ६ प्रभाग हे बिनविरोध झाले आहेत .

आंबेड बु. ग्रामपंचायत उमेदवार

▪️ प्रभाग क्रमांक 1

1-ममता कानर -बिनविरोध

2- संचिता पाचकले -बिनविरोध

3- काशिनाथ कानर -बिनविरोध

प्रभाग क्रमांक 2- सदस्य निवडणूक

1- सल्लाउदीन बोट - विरुद्ध - शोयब भाटकर     

2) सुरेश किंजळे -विरुद्ध - राकेश गुरव

3) सरिता आंबेकर - विरूद्ध - पुजा मोहिते

प्रभाग क्रमांक 3

1- नुपूरा मुळ्ये - बिनविरोध

2-साक्षी शिगवण - बिनविरोध

3- अनंत मोहिते - विरूध्द - राजेश आंबेकर

जनतेतून सरपंच निवडणूक

 1) सुहास मायंगडे

2) शोयब भाटकर

3) अनिरुद्ध मोहिते

4) रघुनंदन भडेकर 

यांच्यात सरपंच निवडणूक होणार आहे.

आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत . यातील प्रभाग क्रमांक १ बिनविरोध करण्यात आला आहे . 

 कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकूण २ उमेदवार रिंगणात उतरले आहेत . तर असुर्डे या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत .