चिपळूण : शहरातील भोगाळे येथे पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या तळ्यात कमळ काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय ऊर्फ राजा चंद्रकांत शिगवण ( वय ४० वर्षे, ओझरवाडी, चिपळूण ) असे या प्रौढाचे नाव आहे. भोगाळे येथे पडिक जमिनीत पावसाचे पाणी साचून त्याला तलावाचे स्वरूप होते. हा परिसर दलदलीचा असून, तिथे कमळे उगवत असतात. रविवारी शिगवण हे नेहमीप्रमाणे कमळे काढण्यासाठी गेले होते. अशातच त्या दलदलीच्या पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.