महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे यांच्या उपस्थितीत येनोली तांडा येथील कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.....
दिनांक 03 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश भैय्या नागरे व जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिंतूर तालुक्यातील येनोली तांडा येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या मध्ये भारत पवार, सुनील जाधव, अमोल जाधव, प्रल्हाद पवार, गजानन आढे आदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सभापती राजेंद्र नागरे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ काळे, नागसेन भेरजे, सेलू जिंतूर विधानसभा अध्यक्ष रामेश्वर घुगे मागासवर्गीय तालुकाध्यक्ष लखन कुरे, रावसाहेब खंदारे, शहराध्यक्ष बासू खान पठाण, डॉ.निशांत मुंढे नवनाथ घुगे आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते