देवदर्शन घेऊन परत निघालेले दोन युवक जागीच ठार
सोलापूर :- देवीचे दर्शन घेऊन तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने येत असताना मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
रवींद्र नागनाथ अलशेट्टी (वय-२२) व व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती (वय-२४,दोघे रा. नवीन विडी कुंभारी, सोलापूर) असे या अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
एम.एच.१३.डी.क्यू. ४२१० ही अशोक लेलँड वाळूवाहतूक हायवा तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने येत होती. दुचाकी वाहनावरून हे दोघे मयत युवक तुळजापूरहून देवीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने वेगाने निघाले होते.
मेजरसाब धाबा समोर ते अचानक या मालवाहतूक ट्रिपर गाडीच्या आडवे आले. त्यामुळे या गाडीची दुचाकीस मागून जोराची धडक बसली. या अपघाताची माहिती तालुका पोलीस ठाण्याला देण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय राठोड व त्यांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले.