रत्नागिरीतील तरुणीने चित्रकलेची आवड जोपासत निर्जीव दगडामध्ये हुबेहूब चित्र काढून जिवंतपणा देण्याचा प्रयत्न केला आहे. स्टोन पेंटिंग वेगवेगळ्या आकाराचे दगड गोळा करून त्यांच्यावर चित्र रेखाटण्याचा छंद जपते आहे. निर्जीव दगडात रंग भरणारी कलाकार म्हणून तिची ओळख झाली आहे. या युवा चित्रकार तरुणीचं नाव आहे श्वेता केळकर. 

श्वेता ह्या व्यवसायाने स्थापत्यविद्या पदवीधर आहेत. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात त्यांनी पदवी घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. असं असलं तरी त्यांची मूळ आवड ही चित्रकला आहे . निर्जीव दगडात रंग भरण्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही दगडावर चित्र रंगवता येत नाही त्यासाठी नदित किंवा समुद्रात जाऊन एक बाजू गुळगुळीत झालेला दगड घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे चित्राला साजेसा आकार असलेला दगड शोधावा लागतो. दगड हे कागद आणि कॅनव्हॉसच्या तुलनेत बरेच लहान असल्यामुळे त्यावर चित्रं रंगवताना खूप जागरूक राहावे लागते. त्याचबरोबर चित्र तयार झाल्यावर त्याला बॉर्निश लावल्यास ते चित्र धूळ व पाण्यापासून सुरक्षित ठेवावे लागते, असे सांगितले.

श्वेताने स्टोन पेंटिंग वेगवेगळ्या केलेल्या आहेत परंतु गणपतीपुळ्यातल्या गणपतीचं आणि मांजराच चित्र रसिकांच्या पसंतीस उतरली आहेत. शाळेत असताना चित्रकलेच्या परीक्षा दिल्या होत्या. आधी जलरंगात सुरुवात करुन मग पोस्टर कलर , अक्रालिक रंग आणि तैलरंगात कामं सुरू केलं. निसर्ग चितारायला त्यांना खूप आवडतं . तशीच आणखी एक आवड म्हणजे समुद्र चितारण्याची .

असंख्य निसर्गचित्र त्यांनी आजपर्यंत रेखाटली आहेत. गणपतीपुळे येथील गणेश मंदिर आंबा घाटातील वळणे ही चित्रे विशेष आकर्षण ठरत आहेत. या सगळ्या आवडीत त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले आहे ते चित्रकार रविंद्र मुळें यांचें असे त्या सांगतात. त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.