बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील सिद्धार्थ बुद्ध विहार भीमनगर येथे बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व धम्मदेसना कार्यक्रम ढेकनमोहा येथे संपन्न झाला. यावेळी सकाळी 9.30 वाजता ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यानंतर 10.00 वाजता गावातून भव्य मरून मिरवणूक काढण्यात आली. 11वाजता बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करून कार्यक्रमाचे उद्घाटन व धम्मदेशना करून दुपारी 2.00 वाजता भोजनदान व खिरदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी पु.भिक्खु धम्मशील यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमासाठी रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे, प्रा. प्रदीप रोडे, बीड तालुका अध्यक्ष किसन तांगडे, युवक रिपाई तालुकाध्यक्ष सुभाष तांगडे, प्रदीप थोरात, प्रा. राम गायकवाड सर, शितलकुमार सुकाळे सर, प्रभाकर चांदणे, भाऊसाहेब दळवी, शाम वीर, भानुदास तांगडे, रामेश्वर तांगडे, गणेश वाघमारे, माजी सरपंच नागेश शिंदे, प्रतिम शिंदे ग्रामपंचायत सदस्य. महादेव थापडे, नारायण देवकते, उमेश थापडे बाबासाहेब डोंगरे भागवत डोंगरे , विकास शिंदे, शरद शिंदे, विनोद शिंदे, दिलीप शिंदे, लक्ष्मण शिंदे, बाबासाहेब शिंदे, अमित शिंदे, सुभाष शिंदे, विनायक खळगे, विकास मस्के, सखाराम शिंदे, अरुण शिंदे, मच्छिंद्र शिंदे, रमेश शिंदे, नितीन शिंदे, कृष्णा ससाने, रामेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, पोपट शिंदे, दीपक जावळे, अनंत विद्याघर, प्रकाश ससाने, समाधान आठवले, महेद्र निसर्गध, बापूराव शिंदे, समाधान शिंदे, राहुल शिंदे, अरविंद शिंदे, सोनाजी शिंदे, प्रभाकर शिंदे, अमोल शिंदे, प्रदीप शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमासाठी ढेकणमोहा परिसरातील उपासक उपाशीका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.