परभणी, दि.२ (प्रतीनीधी):- युवा व खेल मंत्रालय यांनी पुढाकार घेवुन "फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि. मी. धावणे/चालणे उपक्रमाचे व्यापक स्वरुपात नियोजन करण्यात आले असून हा उपक्रम दि. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सर्वत्र राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. 2 ऑक्टोबर, 2022 रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव "फिट इंडिया फ्रीडम रन" 3.0 कि. मी. धावणे/चालणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आज येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी 7.00 वाजता जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फॉर्ग रनची सुरुवात करण्यात आली. हि रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरुवात होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, ग्रॅन्ड कॉर्नर, महात्मा फुले पुतळा यामार्गने या रॅलीची जिल्हा क्रीडा संकुल येथे सांगता करण्यात आली.

यावेळी शिक्षणाधिकारी (मा.) आशा गरुड, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, राखीव पोलिस निरिक्षक श्री. दामोदर, क्रीडा अधिकारी शैलेंद्रसिंह गौतम, एकविध खेळ संघटनेचे धनजय बनसोडे, सुशिल देशमुख, पांडुरंग अंभूरे, शिवाजी खूने, विजय तिवारी, सय्यद शकील, बाळू मुदगलकर, प्रदीप लटपटे, चेतन मुक्तावार, यमनाजी, चाऊस, शेख तस्लीम, जाधव, स्काऊट गाईडचे समादेशक तायडे, पंडित, धिरज नाईकवाडे, योगेश आदमे, प्रकाश पंडित, महेंद्र धबाले, सचिन सरगर यांच्यासह शहरातील सुमनताई गव्हाणे विद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, गांधी विद्यालय, रशिद इंजिनिअर स्पोर्ट्स अकॅडमीचे पोलिस प्रशिक्षणार्थी विदयार्थी, बॉक्सींग, वुशु रग्बी, ॲथलॅटीक्स, गटका, ॲरोबीक्स, जिम्नॅस्टीकचे, टेबल टेनिस, फुटबॉल‍ असोसिएशनचे खेळाडू, स्काऊट आणि गाईडचे बहुसंख्येने विदयार्थी तसेच पोलिस दलातील जवान यांच्यासह मोठया संख्येने सहभागी झाले होते.