रत्नागिरी : नवरात्र उत्सवानिमित्त परटवणे येथे जागतिक हृदयरोग दिनानिमित्त स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि माधवबाग रत्नागिरी यांच्यामार्फत कार्डियाक रिस्क असेसमेंट व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
नवरात्र उत्सव मंडळ परटवणे व स्वामी माऊली ट्रस्ट रत्नागिरी व माधवबाग यांच्यावतीने २९ सप्टेंबर रोजी सावरकर विद्यालय परटवणे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात माधवबागच्यावतीने हार्ट रेट, ई.सी.जी, ब्लड प्रेशर, रँडम ब्लड शुगर, कीजिर, बी. एम. आय, वैद्यकीय सल्ला, आहारविषयक सल्ला या शिबिरात माधवबागच्यावतीने देण्यात आला. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्यावतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला परटवणेसह ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी माधवबागच्या डॉ. मृदुला गुजर, डॉ. महेश गुजर यांच्यासह माजी नगरसेवक सलील डाफळे, हेमंत वणजू, उद्योजक सौरभ मलूष्टे, राजेश शेळके, आनंद तापेकर, जान्हवी पाटील, जमीर खलीफे, नितीन जाधव आदी उपस्थित होते.