एम.आय.एम.चे माजी परतूर तालुका अध्यक्ष अझरुद्दीन काझी यांच्या मुलीच्या लग्नात वंचित बहुजन आघाडीचे 2019 चे खासदारकीचे माजी उमेदवार आदरणीय आलमगीर खान हे आले असता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करण्यात आली त्यांनी कार्यकर्त्यांना अंग झटकून कामाला लागण्याच्या सूचना केल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रवि भदर्गे, शहर अध्यक्ष राहुल नाटकर जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे परतुर शहर उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, नितीन खरात,शहर संघटक प्रदीप (दादा) साळवे, सहसंघटक प्रशांत वाकळे, सहसचिव सलीम शेख सदस्य अजर पटेल सचिव दीपक हिवाळे शहर सल्लागार अशोक ठोके, अरुण पाडेवार उपस्थित होते