दापोली :केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी 4 ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या विधानाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. दापोलीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष अण्णा जाधव, महासचिव नितीन जाधव जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गमरे, जिल्हा संघटक मधुकर मर्चंडेसह अनेक कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आठवले व फुलझेले यांच्या फोटोला जोडे मारून निषेध नोंदवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इच्छा नसताना बौद्ध धम्म स्वीकारला असे अतिशय निंदनीय विधान रामदास आठवले यांनी केले तर दुसऱ्याकडे दिक्षाभूमी स्मारक समिती सचिव सुधीर फूलझेले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटंबीयांना दीक्षाभूमीच्या व्यासपीठापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आठवले आणि फुलझेले या दोघांच्या ही धिक्काराच्या घोषणा देत फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला.
यावेळी तालुका अध्यक्ष संतोष धोत्रे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गमरे, जिल्हा संघटक मधुकर मर्चंडे, तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, संघटक मधुकर येलवे, तालुका उपाध्यक्ष शांताराम जाधव, गणपत जाधव, विजय धोत्रे, दीपक धोत्रे, भारतीय बौद्ध सभा महासंघ अध्यक्ष संदीप धोत्रे, रुपेश मर्चंडे, पवन धोत्रे, राजेंद्र कदम, आशिष मोहिते, नदीम कोंडविलकर, विशाल अहिरे, सुदन बोहिरे, प्रथमेश जाधव, प्रभाकर जाधव, मंगेश तांबे, सुभाष कांबळे, शिव कुमार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.