आष्टी- भातोडी ग्रामपंचायतीचे सरपंचावरील अविश्‍वास 1 जुलै 2021 सर्वानुमते पारित झाला होता.सरपंच यांना अविश्‍वास मान्य नसल्याने सरपंच यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल अर्ज दाखल केला होता.बाब न्याय प्रविष्ट असल्याने 20 मे 2022 रोजी सरपंच यांचा अर्ज नामंजूर करण्यात आल्याने भातोडी सरपंच पद रिक्त झाले आहे.गटविकास अधिकारी यांनी ग्रामविकास अधिकारी भातोडी ग्रामपंचायत यांना पत्र काढून रिक्त पदाचा अहवाल तात्काळ कळवावा निलंबाची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर राहिल असे आदेशित केले असताना देखील पद रिक्त न झाल्याने सरपंच पद रिक्त करावे या मागणीसाठी शनिवार दि.1 ऑक्टोंबर रोजी उपसरपंच विकास पांढरे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले आहे.

गटविकास अधिकारी 15 सप्टेंबर रोजी 22 जून 2022 चे रद्द समजवण्यात यावे ग्रामपंचायत भातोडी सरपंच थेट जनतेतून निवडणूक द्वारे भरवण्यात आल्याने 29-08 – 2022 नवीन नियमानुसार पुढील कारवाई करावी करावी असे थोरे ग्रामसेविका यांना पत्र काढले होते. उपोषकर्ते उपसरपंच विकास पांढरे यांनी मागणी केली आहे.की तात्काळ ग्रामसभा घेऊन सरपंच पद रिक्त होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी उर्मिला शिंदे, सिद्धेश्‍वर शिंदे,वसंत शेकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश गिते, चेअरमन केदार गिते,मा.सरपंच सोमनाथ गिते,अशोक गिते, मा.सरपंच महादेव शिंदे,बंडु गिते, रामचंद्र गिते,आजिनाथ पांढरे, मा.महादेव पांढरे, ज्ञानेश्‍वर गिते,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.उपोषण स्थळी बीट अंमलदार आकाश आडागळे,पो.कॉ.विलास गुंडाळे, होमगार्ड एस डी वांढरे,आर.आर.मोहिते,यांचा बंदोबस्त आहे.