आष्टी प्रतिनिधी

 25 सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मासिस्ट डे म्हणून साजरा करण्यात येतो याच अनुषंगाने

कडा येथील येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित गंगाई फार्मसी कॉलेज कडा याठिकाणी जागतिक फार्मासिस्ट डे साजरा करण्यात आला. या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी कडा शहरामध्ये आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये सध्या असलेले संसर्गजन्य आजार याविषयी व त्या आजाराविषयी घेण्याची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांनी लोकांना मार्गदर्शन केले. त्याचवेळी विद्यार्थ्यांनी कडा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य सादर केले या पथनाट्या मध्ये फार्मसीस्ट चे महत्त्व समजून सांगण्यात आले.

त्याचवेळी कडा मधील वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये असलेल्या पेशंटना ही भेटी देऊन पेशंट कौन्सलिंग केली व पेशंटच्या अडचणी जाणून घेऊन पेशंटला मार्गदर्शनही केले.

तसेच कडा येथील मेडिकलमध्ये असलेल्या वेगवेगळ्या फार्मसिस्ट यांचा सत्कारही करण्यात आला.

    दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन चा शेवटचा दिवस या दिवशी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट प्रेझेंटेशन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत सर हे होते तसेच श्रीराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य गीर्हे सर, उपप्राचार्य गांगर्डे सर व प्रा. ढवळे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 17 ऑगस्ट पासून ते 16 सप्टेंबर पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टचे काम करून आपला शोधनिबंध (पेपर) बनवला त्याची हार्ड कॉपी 16 सप्टेंबर रोजी कॉलेज ला जमा केले व जागतिक औषध निर्माण शास्त्र दिवस या निमित्ताने विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रेझेंटेशन केले. 

   सुरुवातीला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून. यावर्षी सुरुवातीला राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन चे द्वितीय पारितोषिक मिळवणारी कु. स्नेहल चव्हाण हिला मिळाले होते तिचा गौरव करण्यात आला त्यानंतर यावर्षी झालेले कार्यक्रम पोस्टर मेकिंग, स्पीच कॉम्पिटिशन, नॅशनल स्पोर्ट्स डे याच्या सर्टिफिकेट चे वाटप अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ. डी बी राऊत सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रोजेक्टचे कौतुक केले तसेच आपल्या आनंद चॕरीटेबल संस्थेच्या फार्मसी कॉलेजमधून विद्यार्थी हा क्वालिटी एज्युकेशन घेऊन बाहेर पडण्यासाठी,सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. डिप्लोमा च्या विद्यार्थ्यांनी पेपर पब्लिश केले याचे त्यांनी कौतुक केले व विद्यार्थ्यांची कल्पकता व इतर स्किल वाढले पाहिजेत तसेच विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले पाहिजेत यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना एज्युकेशन मध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून या कॉलेजसाठी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली तर संस्था देत आहे आणि देत राहील आश्वासनही दिले. आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भिमरावजी धोंडे साहेब यांच्या सांगण्यानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थी हा उच्च स्थानापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी संस्था सदैव कार्यरत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही असाच अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नेहमीच नियोजन करू तसेच यावर्षी गंगाई फार्मसी कॉलेजच्या डिप्लोमा चे विद्यार्थी कु. गोणेवार ज्योतीलक्ष्मी, कु. तांबे माहेश्वरी, सोले सुरज व प्रतीक जगताप यांचे इंटरनॅशनल जर्नल मध्ये पेपर पब्लिक झाले याबद्दल तसेच पवार अनुराधा, जाधव रविराज, उगले पूनम, नरवडे शितल, जठार निकिता व शुभांगी शिंदे यांचेही पेपर स्विकार झालेले आहेत आणि ते लवकरच पब्लिश होतील याबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या गाईड व प्राचार्य यांचे हार्दिक अभिनंदन केले व कौतुक केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री भिमरावजी धोंडे साहेब, डाॕ.अजय दादा धोंडे, श्री अभय राजे धोंडे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत, श्री शिवदास विधाते, श्री दत्तात्रेय गिलचे, श्री माऊली बोडखे, श्री शिवाजी वनवे, श्री संजय शेंडे व प्राचार्य अशोक गदादे यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना लाभलेले गाईड रागिनी सोळंके, मंगल लाटे, साईनाथ पांढरे, राहुल दानवे, काजल देवकर यांचे अभिनंदन केले तसेच या कार्यक्रमासाठी अनिकेत डाके, श्री राऊत, विकास अनारसे, पल्लवी बोडखे, सुजीत अनारसे, गणेश गांजुरे, किशोर शिंदे व संगिता राऊत यांनीही आपले योगदान दिले