रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सध्या हातखंबा ते निवळी दरम्यान सुरू होऊन महिना झाला तरीही काम पूर्ण होताना दिसून येत नाही. मुख्य रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत असल्याने सध्या नागरीक, वाहनचालक व दुकानदार यांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. यातच सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर मारत असलेले पाणी देखील अपघातास कारणीभूत ठरत आहे.
हातखंबा ते निवळी दरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन बरेच दिवस लोटले. या रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीमुळे उडणाऱ्या धुळीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो. धुळीचे लोळं हवेत पसरतात त्यामुळे ठेकेदार सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी मारत आहे. या पाण्यातून दुचाकीस्वार घसरून अपघाताच्या घटना घडत आहे. या मार्गावर दररोज एक ते दोन अपघात हमखास होत असल्यामुळे दुचाकीस्वारांना हा मार्गच धोकादायक ठरत आहे. ग्रामीण भागातील नागरिक दररोज कामानिमित्त रत्नागिरी शहरात येत असतात. पुन्हा सायंकाळी याच मार्गावरून नागरीकांना घरी परतावे लागते. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने त्याचा त्रास पादचारी, वाहनचालक व लगतच्या दुकानदारांना देखील होतो. या सर्वच त्रासामुळे सर्वसामान्य नागरिकांसह प्रवासी, वाहनचालक हैराण झाले आहेत.
रस्त्यावर धो-धो मारले जातेय पाणी
ठेकेदाराकडून सकाळी व सायंकाळी नियमित पाणी रोडवर मारले जाते. परंतू ते पाणी झारणीने न मारता पाण्याचा टँकरच पूर्ण रस्त्यावर फिरवला जातो. यातून धो-धो कोसळनारे पाणी दुचाकीस्वारांना अपघाताला निमंत्रण देत आहे. दररोज एक दोन अपघताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ठेकेदाराने या रस्त्यावरील कामात वेग आणून लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
🟢 हातखंबा ते निवळी दरम्यानच्या कामाला गतीच नसल्यामुळे दररोज एक-दोन अपघाताच्या घटना घडत आहेत. मोठ्या प्रमाणात मारत असलेल्या पाण्यातून दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडतात. मारत असलेल्या पाण्यातून माझा देखील घसरून अपघात झाला आहे. संबधित ठेकेदाराने लवकरात लवकर काम पूर्ण करावे व दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, तरच होणारे अपघात टाळता येतील.
-प्रवासी रेहान खान, उक्षी