सोनपेठ (प्रतिनिधी)प्रतिवर्षी नवरात्र उत्सवात डिघोळ येथील देवी संस्थान येथे विटेकर परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन आपण करत असतो. यावर्षी महाप्रसादाच्या निमित्ताने आमचे नेते आ.श्री. धनंजय मुंडे साहेबांना फोन करून महाप्रसादासाठी उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. आपल्या विनंतीला मान देऊन ते यावेळी उपस्थित राहिले.
डिघोळ येथील श्री रेणुका देवी संस्थानची तीन पिठे आहेत. श्री रेणुका, जगदंबा व तुळजाभवानी ही तीन पिठं इथे पुरातनकाळापासून आहेत. ही तीन पीठे मिळून हे संस्थान पूर्ण होते. विशेष म्हणजे मुंडे परिवाराची कुलदेवी डिघोळ येथील हेच रेणुकादेवी संस्थान असल्याने प्रतिवर्षी त्यांच्या परिवारातील सदस्य इथे दर्शनासाठी येत असतात. काल आ. धनंजय मुंडे साहेबांच्या आईंनी याठिकाणी येऊन दर्शन घेतले.
"या ठिकाणचे मंदिर हेमाडपंथी अतिशय अप्रतिम सौंदर्यदृष्टी ठेवून बनवलेली एक वास्तू आहे. डिघोळ येथील हे देवी संस्थान माझे कुलदैवत असल्याने या ठिकाणी आम्ही मुंडे परिवारातील व्यक्ती वारंवार येत असतात. या संस्थानाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी स्वतः लक्ष घालून काम करून घेण्याचा माझा मानस आहे. बाहेरून या वास्तूसाठी आवश्यक असलेले दगड आणून अतिशय उत्कृष्ट प्रकारचे कोरीव काम होऊन जुन्या पद्धतीने या मंदिराचे आरेखन आपण करू. या संस्थानाला जास्तीत जास्त निधी देऊन ते कसं नावारूपाला आणता येईल याची काळजी घेऊ," असे प्रतिपादन यावेळी मुंडे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
श्री रेणुका देवी संस्थानच्या विकासाचे अभिवचन दिल्याबद्दल विटेकर परिवाराच्या व सर्व भक्तांच्या वतीने त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी श्री. अजयशेठ मुंडे, लक्ष्मणराव पौळ, चंद्रकांत राठोड, लक्ष्मीकांत देशमुख, दशरथ सूर्यवंशी, श्रीकांत विटेकर व यावेळी परिसरातील भाविक भक्त, तालुक्यातील पदाधिकारी, डिघोळ गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.