धर्माबाद ग्रामीण रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून 108 ची रुग्णवाहिका जनतेच्या रुग्णाच्या सेवेमध्ये रुग्णवाहिकेचा लाभ व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 108 ची रुग्णवाहिका ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.धर्माबाद ग्रामीण रुग्णालय येथे दिलेली ती रुग्णवाहिका असून अडचण नसून कोळंबा असल्यासारखी आहे. दि.३ नोव्हेंबर २०२२ रोजी लक्ष्मीबाई जळबा बनसोडे या महिलेस छातीत दुखायला लागले आसता सायंकाळी अंदाजे १.३० वाजता ग्रामीण रुग्णालय येथे आले. ग्रामीण रुग्णालयात आल्यावर प्रथमोपचार म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डि ए.मो.डॉक्टर यांनी लक्ष्मीबाई यांची ईसीजी काढण्यात आली व ईसीजी मध्ये तिव्र हृदय विकाराचा झटका आला असल्याचे रिपोर्ट मध्ये दिसून आले. त्यानुसार महिलेस प्राथमिक उपचार करून नातेवाईकांना पुढील उपचारासाठी नांदेड जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करावे लागते असा सल्ला नातेवाईकांना दिला.त्यानंतर कुटुंबीय रुग्णालयातील १०८ रुग्णवाहीकेला फोन केले. असता १०८ वरील डॉक्टर हे धर्माबाद राहायला असून देखील मला रुग्णालयात यायला अर्धा पाऊण तास वेळ लागते असे नातेवाईकांना फोनवरून सांगितले. व अर्धा- तास उशिराने आले जेव्हा की तेथे १०८ ची रुग्णवाहिका ही रुग्णालयात उपलब्ध होती गाडीवर पायलट (ड्रायव्हर) देखील उपलब्ध होता. गंभीर रुग्णाला डॉक्टर विना पुढे नेता येत नाही व रस्त्यातच काही बरे वाईट झाल्यास परेशानी होऊ नये म्हणून डॉक्टर हा १०८ च्या रुग्णवाहिकेवर असतातच पण धर्माबादचे डॉ पदमाकर हे हमेशा प्रत्येक पेशंटला अर्धा ते पाऊण तास रुग्णालयातच ताटकळत ठेवतात व पेशंट अति गंभीर झाला की नातेवाईकांना सांगतात की नांदेड पेशंट पोहोचत नाहीत आपणास नांदेड ला जायला तीन साडेतीन तास लागतात असे सांगत. ब-याच रुग्णांना नांदेड ऐव्हजी निझामाबादलाच घेऊन जाण्यास जास्त भर देतात. रुग्णांच्या नातेवाईकांना निजामाबादला प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जाऊन स्वतःच चांगभलं करून घेत आहेत. असे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. धर्माबाद येथील डॉक्टरांनी लक्ष्मीबाई बनसोडे यांना दोन तासापर्यंत पुढील उपचारासाठी नांदेड येथे पोहोचवा असे सांगितले. १०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर पदमाकर हे अर्धा पाऊण तास उशिरा आले व रुग्णाच्या नातेवाईकाला म्हणाले होते की आपला पेशंट हा गंभीर असल्यामुळे आपल्या नांदेडला जायला विलंब होते तीन तास लागतात त्यापेक्षा आपण निजामबाद ला जाऊ माझ्या ओळखीचे प्रायव्हेट दवाखान्याचे डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन तिथे उपचार घ्या? असे रुग्णाच्या नातेवाईकांना सल्ला दिले पण रुग्णाचे नातेवाईक हे गरीब असल्यामुळे प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये उपचार आम्हाला घेणं शक्य नाही आमच्या कडे पैसे नाहीत. म्हणून आम्हाला शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे जायचे आहे असे त्यांना सांगितले असता हे लोक माझे ऐकत नाही असा मनात डाव धरून धर्माबाद- उमरी ते मुदखेड मार्ग जिल्हा शासकीय रुग्णालय विष्णुपुरी हे ७५-८० किमी असून नांदेड पोहचायला जास्तीत जास्त दिड तास लागतो.पण १०८ रुग्णवाहिकेच्या डॉक्टर मुळे धर्माबाद वरून भोकर मार्गे विष्णुपुरी हे १२०-१२५ किलोमीटर अंतर पडते आडीच ते तिन तास लागतात डॉक्टरांनी जाणून-बुजून भोकर मार्गाने घेऊन गेले असल्याने डॉक्टर पदमाकर हे लांब पडल्या वरून नांदेड विष्णुपुरी ला घेऊन गेले असल्याने नांदेड पोहचायला विलंब झाला. विष्णुपुरी येथील डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही जर वीस मिनिट पंचवीस मिनिटे अगोदर आले असता तर आपण एन्जोग्राफी करून किती ब्लॉकेज बसले आहेत ते पाहून पुढील उपचार करून आपण काहीतरी चांगलं केलो असतो. असं डॉक्टरांनी मनले आहे तरी त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या मृत्यू सर्वस्वी जबाबदार हे १०८ चे डॉक्टर पदमाकर हे जबाबदार आहेत. असे मयताचे मुलगा उत्तम बनसोडे यांनी सांगितले आहे. माझ्या आईला त्रास होत होता डॉक्टर यांनी गाडी मध्ये कसलाही उपचार देखील केला नाही? डॉक्टर गाडी मध्ये काही तरी उपचार केले असते तर तब्येतीमध्ये सुधारणा झाली असती? गाडीमध्ये उपलब्ध असुन ते पुढे बसून होते पण इलाज केले नाही ते रुग्णवाहिकेचे डॉक्टर आहेत की गाडी चे किनयर आहे? असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. आम्हाला डॉक्टर व पायलट ड्रायव्हर यांनी नांदेड ला जाते वेळेस खुप मानसिक छळवणूक केली. माझ्या आईच्या मृत्यूस १०८ चे डॉक्टर जबाबदार आहेत.आमच्या सोबत जे घडले ते इतरांसोबत घडु नये व १०८ वरील डॉक्टर वर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत लक्ष्मीबाई चा मुलगा उत्तम बनसोडे यांनी मा.तुकाराम मुंडे महाराष्ट्र आरोग्य आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई , मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकार्यालय नांदेड, मा.जिल्हा व्यवस्थापक अधिकारी बीव्हीजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नांदेड, यांना स्पिड पोस्टाने पत्र पाठवले आहे.मा. वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, सह मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन धर्माबाद येथे निवेदन दिले आहे. डॉ.पदमाकर यांच हे आताच एकाच वेळीच नसुन प्रत्येक वेळी चा असंच आहे असी चर्चा आहे .