गेवराई आगारात दुरूस्ती अभावी 7 बसेस धुळ खात उभ्या

गेवराई (प्रतिनिधी) गेवराई आगारात बस उपलब्ध असताना छोट्या मोठ्या दुरुस्ती अभावी 7 बसेस धुळ खात उभ्या असून गेवराई आगाराच्या वतीने वारंवार बसच्या दुरुस्ती साठी निधीची मागणी करुनही बीडचे आगार प्रमुख याकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे बीड आगार प्रमुख प्रशासना विरूध्द प्रवाशात व विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या शुल्क दुरुस्तीमुळे बंद पडलेल्या बसमुळे गेवराई आगारात बसची कमतरता भासत असल्याने बस फेऱ्या अभावी विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय ड्युटी नसल्याने वाहक चालक हे देखील हतबल दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बस तात्काळ दुरुस्त करा आणि ग्रामीण भागातील बसेस चालू करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी अजय मोरे यांच्या कडे फोनद्वारे केली आहे.

कोरोना काळ संपल्याने सर्वच लोक घरा बाहेर पडुन प्रवास करत आहेत. तर शाळा, कॉलेज पुर्ववत चालू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी शाळा, काॅलेजला जाण्यासाठी तासंतास बसची वाट पाहत उन्हातान्हात उभे राहतात. मग एखादी बस गावात येते तिही दोन तीन गावातील प्रवाशी घेऊन शिवाय ही बस प्रवाशाने खचाखच भरलेली असते त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभा राहून यावे लागते तर काही वेळेस उभा राहण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने बस मधील वाहक बस न थांबताच पुढे निघून जातो. तर काही ठिकाणच्या बस फेऱ्या या उशिरा होत असल्यामुळे बस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने काही विद्यार्थी जिव घेणा प्रवास करुन आपली शाळा व काॅलेज गाठावे लागते आहे. तर काही वेळा विद्यार्थ्यांना ना विवादास्पद आपली शाळा व काॅलेज बुडविण्याचे वेळ येत आहे. अशी परिस्थिती सध्या तालुक्यात बस फेऱ्या अभावी दिसून येत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्याकडे तालुक्यातील अर्धमसला येथील विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणीचे गाराने व्यक्त केले असता. मोटे हे विद्यार्थी सोबत गेवराई आगारात गेले असता त्यांना दुरुस्ती अभावी 7 बस धुळ खात उभ्या असल्याच्या दिसून आल्या तसेच ड्युटी नसल्याने वाहक चालक हे देखील हतबल दिसून आले. या विषयी गेवराई आगार प्रमुख यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्यांना बसच्या दुरुस्ती करण्यासाठी बीडला निधीची मागणी केली असल्याचे सांगितले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी तात्काळ बीड चे अजय मोरे यांना फोन करून हे सुधारा व विद्यार्थी चे नुकसान टाळा अशी मागणी मनसेच्या व विध्यार्थीच्या वतीने केली. यावेळी उपजिल्हा अध्यक्ष नीलकंठ वखरे, अशोक नरवडे अंगद कादे गोपाल सागडे यांची उपस्थिती होती.