चौकशी करण्यास टाळाटाळ मंडळ अधिकारी व तलाठी बीड यांचेवर कार्यवाही करा.

बीड(प्रतिनिधी) केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण उद्देश सामोरे ठेवून व दरवर्षी हजारो झाडांची कत्तल थांबून पर्यावरण हित जपत प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरापर्यंत व गरीब कुटुंबांना एलपीजी सिलेंडर कनेक्शन मोफत देण्यासाठी ही योजना सुरू केली होती. बीड तालुक्यामध्ये प्रदीप गॅस एजन्सी यांनी ग्रामीण भागातील लोकांचे प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस सिलेंडर कनेक्शन मोफत उपलब्ध करून देतो असे म्हणत ग्रामीण भागात कॅम्प लावले व त्यांच्याकडून बीपीएल कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबर पासपोर्ट वयाचे प्रमाणपत्र बीपीएल यादीतील नाव मुद्रण बँक पासबुक रेशन कार्ड असे आवश्यक कागदपत्र जमा केले परंतु आज पर्यंत यातील काही लोकांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मंजूर झालेले मोफत एलपीजी गॅस सिलेंडर अद्यापही प्राप्त झाले नाहीत प्रकरणी संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर सिलेंडर कनेक्शन घेतलेल्या गॅसची सबसिडी जमा होत आहे.

प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वारंवार सदर तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ चौकशी करावी यासाठी पाठपुरावा केल्यानंतर दिनांक 23 मार्च 2021 रोजी तक्रारीत नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने चौकशी करून नियमानुसार उचित कार्यवाही करावी असे आदेशित केले होते. तहसील कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे 31 मार्च 2022 रोजी मा. तहसीलदार बीड यांनी मंडळ अधिकारी मंडळ विभाग बीड ता. बीड तलाठी तलाठी सजा बीड ता. बीड यांच्यामार्फत चौकशी करून चौकशी अहवाल सादर करावा असे आदेशित केले होते परंतु गेल्या सहा महिन्यापासून सदर प्रकरणी कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आलेली नाही. प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून शासन नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करावी. यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अजय सरवदे, शेख युनूस भाई सहसचिव, बालाजी जगतकर प्रसिद्धी प्रमुख लखन जोगदंड शहराध्यक्ष, शेख शहबाज यांनी तहसीलदार बीड यांना भेटून तक्रार दिली.