राजापूर : तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाटेच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत आंबोळगड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारचे आरोग्य शिबिर आंबोळगड येथे करण्यात आले होते. अंगणवाडी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये बीएमआय, रक्त तपासणी ,किडनी फंक्शन , लिवर फंक्शन, कावीळ आदी तपासण्या करण्यात आल्या.

या शिबिरासाठी रत्नागिरी पोलिस दवाखान्यातील पॅथॉलॉजी स्टाफ, धारतळे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निखिल परांजपे, श्रीमती अंकिता घवाई , मयूर वानखेडे ,सुभाष वळंजू रमेश सुतार संजय वसावे अश्विनी नायर आदि कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य शिबिराला सुमारे शंभर ते सव्वाशे ग्रामस्थानी हजेरी लावत आरोग्य तपासणी करून घेतली.

या शिबिराला सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील ,गोपनीय हवालदार दीपक काळे, सागर कोरे ,आंबोळगड सरपंच साक्षी करगुटकर सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ विश्वास करगुटकर आदींसह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.