औरंगाबाद, दिनांक 30 : खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उरूस साजरा होत असून 9 ऑक्टोबर रोजी चंद्रदर्शना प्रमाणे ईद-ए-मिलाद हा सण साजरा होणार आहे. सदर उर्ससाठी महाराष्ट्रातून 8 ते 10 लाख भाविक आपले खाजगी वाहनाने व इतर वाहनाने हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पैरहन मुबारक व (मिशीचे केस) याचे दर्शनासाठी येतात.
खुलताबाद हे गाव सोलापुर धुळे राज्य् महामार्ग क्र. 52 वर औरंगाबाद ते कन्नड दरम्यान असल्याने मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतुक चालू असते. तसेच जगप्रसिद्ध वेरुळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर सदर महा मार्गावर येत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. याकरीता 2 ऑक्टोबर रोजीचे 2 ते 15 ऑक्टोबर पर्यंत वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येत आहे.