चिपळूण : चिपळूण येथे रेल्वेमध्ये चढताना वृद्धेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा 60 हजारांचा ऐवज चोरीस गेला. या प्रकरणी निलम चंद्रकांत कोळवणकर (72, अंधेरी, मुंबई) यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम कोळवणकर या चिपळूणहून मुंबईच्या दिशेने डबल डेकर जात होत्या. चिपळूण रेल्वे स्थानकावर ट्रेन मध्ये चढताना गर्दीचा फायदा उठवून अज्ञाताने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली. यामध्ये 60 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद निलम कोळवणकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.