सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर असलेल्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने येणाऱ्या गळीत हंगामात उसाला प्रति टन २७०० रुपये दर जाहीर केला आहे. जिल्ह्यात ऊस दराची उत्सुकता वाढली असताना पांडुरंग कारखान्याचे चेअरमन माजी आ. प्रशांत पांडुरंग कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन प्रशांत परिचारक, परिचारक यांनी ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऊस दराची कोंडी फोडून जिल्ह्यातील साखर कारखानदारांची झोप उडवली आहे.
सभासद शेतकरी पुरस्काराचे मानकरी...
पांडुरंग कारखान्यातर्फे दरवर्षी सभासद शेतकऱ्यास पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार दिला जातो. यावर्षी पांडुरंग ऊस भूषण पुरस्कार विजेते शेतकरी महेश व्यवहारे यांनी एकरी १०८ मे. टन उसाचे उत्पन्न घेतले आहे. तसेच पांडुरंग आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते शेतकरी सचिन रोगे (खर्डी, ८० मे. टन), मधुकर मस्के (नारायण चिचोली, ९८ मे. टन), बंडू शिंदे' (अनवली, ५६ मे. टन), राजाराम पवार (मेंढापूर, ५० मे.टन), रमेश खारे (करकंब, ५६ मे. टन) यांना सहकुटुंब सन्मानित करण्यात आले..
येणाऱ्या हंगामात साखर उतारा किती असणार याचा अंदाज नाही तरीही ११ टक्केच्या पुढे साखर उतारा जाईल. त्यानुसार २७०० रुपये दर येणाऱ्या उसाला दिला जाईल. तसेच ११.५० ते १२ टक्के साखर उतारा घेण्याचा मानस आहे. त्यानुसार २८०० रुपयांपर्यंतही दर जाऊ शकतो, असे परिचारक म्हणाले. पांडुरंग कारखान्याची ३१ वी सर्वसाधारण सभा श्रीपूर येथील श्री गणेश हॉलमध्ये पार पडली.