ओम एजन्सी चा बाकीचा साठा कुठे आहे ?

 बीड (प्रतिनिधी)नवराञ उत्सवाची नुकतीच सुरूवात झाली आणी अन उपवास धरलेल्या अनेकांनी भगर खालली या भगरीमुळे अनेकांना विषबाधा झाली बीड,शिरूर,गेवराई तालुक्यातील लोकांना विषबाधा झाली यावर बीड जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले अन्न व औषध प्रशासन विभागाने बीड येथील ओम एजन्सीवरती कारवाई करून फक्त 1800 किलोचा साठा दाखवला असुन बाकी साठा ओम एजन्सीची हातमिळवणी करून दाबला आहे अशी शंका येत असुन अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेली कारवाई ही केवळ दिखावा असुन ओम एजन्सीचा बाकीचा साठा गेला कुठे याची तात्काळ चौकशी करून योग्य कारवाईत करण्यात यावी अन्यथा द्वारकाधीश ग्रुपच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा द्वारकाधीश ग्रुपचे बबलु शिंदे यांनी दिला आहे.