संगमेश्वर : देशाचे आदरणीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांचा ७२ वा वाढदिवस देशभरात भाजपा कार्यकर्ते व मोदीप्रेमी संस्थांच्या माध्यमातून सेवाभावी कार्यक्रम राबवून साजरा केला जात आहे. यामध्ये विद्यार्थी आणि शाळा यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना सहाय्यभूत ठरतील अशा वस्तू भेट देण्याचा संकल्प रत्नागिरी द. चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. हरीभाई पटेल यांनी केला.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जि.प. शाळा माभळे घडशीवाडी या शाळेस साऊंड सिस्टीम आवश्यक होती. यावेळी माभळे येथील स्थानिक व्यापारी व भाजपा कार्यकर्ते श्री. सतीशभाई पटेल यांच्या माध्यमातून शाळेची ही गरज पूर्ण करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या दरम्यान श्री. हरीभाई पटेल यांनी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना सेवेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच मा. मोदीजी देशाच्या विकासासाठी कशाप्रकारे प्रयत्न करत आहेत याची माहिती दिली.

या प्रसंगी संगमेश्वर भाजपा तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. दिपिकाताई जोशी, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनुप प्रसादे, श्री. गोविंद भिडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. कोमल रहाटे, सौ.अपर्णाताई भिडे, शहराध्यक्ष दिपक वेल्हाळ, माभळे सरपंच सौ.रंजना घडशी, उपसरपंच जोशी, शा.व्य. समिती अध्यक्षा तसेच सदस्य, पालक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यांच्याकडून उत्तरोत्तर देशसेवा घडावी अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.