खेड : तालुक्यातील बोरज येथील कल्याण टोलवेज कंपनीतील कामगाराने ३५ लीटर डिझेल परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अर्जुन लखनसिंग पाटीदार , संदीप कृष्णा घाटगे ( ४० , भरणेनाका , खेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन लखनसिंग पाटीदार हा छाबड़ा मरीन या कंपनीत जनरेटरच्या देखरेखीसाठी कामाला होता. कंपनीने जनरेटरसाठी आणलेले ३५ लीटर डिझेल पाटीदार याने कॅन भरुन टेम्पो ट्रॅव्हल्स चालक संदीप घाटगे याला दिले. या डिझेलची किंमत ३३९५ रुपये आहे. ही घटना २६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी कंपनीचे रोनित अनिल ईनरकर ( २९ , खेड ) यांनी खेड पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन आणि संदीप यांच्यावर गुन्हा दाखल केला.