रत्नागिरी : कोकणचे प्रबोधनकार काका जोयशींचे प्रबोधनाचे काम पाहून बहुजन चळवळ आणखी जनमानसात कशी लोकप्रिय होईल या उद्देशाने चंद्रपूर येथील डॉ. राकेश गावतूरे, डॉ. रितेश राणे, डॉ. सचिन भेदे, डॉ. राजू ताटेवार, डॉ. सिराज खान, डॉ. राकेश वनकर आणि डॉ. समीर कदम या सात डॉक्टरांच्या टिमने सर्वसामान्य लोकांच्या मनात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक बदल घडवून आणण्याचे कार्य करत आहेत. डॉ. समीर कदम हे सत्यशोधक पद्धतीने लग्न लावत होते, परंतु त्यांना सत्यशोधक शिव - संस्कार ह्या पुस्तकामुळे योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
चंद्रपूरमधील हे सगळे डॉक्टर कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मा. मारुतीकाका जोयशी यांचे विचार आचरणात आणून प्रसार व प्रचार करण्याचे काम करत आहेत. डॉ. रुपेश सोनावले यांच्या वाढदिवसाला मा. मारुतीकाका जोयशी सत्यशोधक शिव प्रवर्तक समितीचे अध्यक्ष व काकांचे सहकारी सत्यशोधक प्रवर्तक मा. विलास डिके उपस्थित होते. डॉ. सोनावले यांच्या वाढदिवसानिमित्त 'सत्यशोधक शिव-संस्कार' हे पुस्तक भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्यशोधक शिव प्रवर्तक समितीचे सदस्य उपस्थित होते.